अजित पवार नाराज असल्याची चर्चा; मात्र पवार तर म्हणतात…

सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात एकाच चर्चा सुरु असून ती म्हणजे राष्ट्रवादीचे रोखठोक नेते अजित पवार आपल्याच पक्षात नाराज असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. मात्र या उठणाऱ्या वावड्यांवर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे या चार्चाना आता काही अंशी ब्रेक लागला आहे.

काय होत प्रकरण?

नवी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन दिवासांचे अधिवेशन झाले होते. यावेळी अजित पवारांच्या आधी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाषण झाले, मात्र अजित पवार यांना बोलू दिले नाही त्यामुळे अजित पवार नाराज झाल्याची जोरदार चर्चा झाली होती. आणि अजित पवार मंचावरून उठून देखील गेले होते.

अजितदादांचे स्पष्टीकरण

अजित पवार म्हणाले की, मी का नाराज होऊ? पक्षाने मला विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री पद दिले. सर्वांनी मिळून शरद पवार यांना अध्यक्ष केले. मला पक्ष डावलत नाही, पक्षाने मला बोलायला सांगितल होते. राष्ट्रीय अध्यक्षांचे भाषण महत्वाचं होते, त्यामुळे वेळेअभावी मी बोललो नाही. मला रुसायचे फुगायचे कारण नाही असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच उठून जाण्यावर ते म्हणाले, मी मध्येच उठून वॉशरुमसाठी गेलो होतो, मी काय बाहेर जाऊ शकत नाही का? असा सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांवर काय परीस्थित आली रे

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठण येथे होणाऱ्या सभेवरुनही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा आहे. सर्व पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका यांना उपस्थित राहावे असे सांगण्यात आले आहे. अशी पद्धत कधीच नव्हती. राजकीय सभेला शासनातील स्टाफला असे कुणाला बोलवता येत नाही. महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडते. गर्दी जमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर ही परिस्थिती आली असेल तर हे गंभीर आहे असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

प्रभादेवी गोळीबार प्रकरणावर भाष्य

यावेळी शिवसेना आणि ठाकरे गटाच्या संघर्षाबाबतही त्यांनी आपले मत मांडले आहे. शिंदे गटालीत आमदार सदा सरवणकर यांच्या तथाकथित गोळीबाराप्रकरणी त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, खुशाल आमदार बंदूक काढतो, आवाज काढतो हे आपल्याकडे झाले नाही. आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करायला लागले मग गृहमंत्री, मुख्यमंत्री काय करतात? पोलिसांनी काय करायचे? अजूनही ठोकण्याची भाषा सुरू आहे, काय चालल आहे? हे लक्षात घेतले पाहिजे असे म्हणत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.