धनगर आंदोलन चिघळण्याची शक्यता बंडगर, रुपणवर यांनी उपचार सोडले.

अहमदनगर :- धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मुंबईत तातडीची बैठक बोलावली होती . या बैठकीत आरक्षणाबाबत कुठलीही सकारात्मक चर्चा न झाल्याने अण्णासाहेब रुपनवर यांनी शुक्रवारी उपचार नाकारत आंदोलन स्थळी येऊन पुन्हा आपले उपोषण सुरू केले. तर सुरेश बंडगर यांनीही आपला ऑक्सिजन मास्क काढून टाकला आहे.

धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या १८ दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील  चोंडी येथे  अण्णासाहेब रुपनवर आणि सुरेश बंडगर यांचं उपोषण सुरू आहे. धनगर समाजाला एनटी प्रवर्गातून साडेतीन टक्के आरक्षण आहे. परंतु एसटी प्रवर्गातून साडेतीन टक्के आरक्षण मिळावे  अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज करत आहे.(dhangar protest) 

गेल्या आठरा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्याने अण्णासाहेब रुपनवर यांनी बुधवार पासून पाणी पिणेही सोडले होते. उपोषणाच्या १४ व्या दिवशी पाणी पिणेही सोडल्याने अण्णासाहेब रूपनवर (annasaheb rupnavr)यांची तब्बेत खालवल्यामुळे त्यांना अहमदनगर (ahemadnagar chondhi)च्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

धनगर समजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी  राष्ट्रवादी युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकते बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी शेंडगे धनगर कृती आरक्षण समितीचे अध्यक्ष हनुमंत सूळ फलटणचे सभापती रामभाऊ ढेकळे खंडाळ्याचे सभापती राजाभाऊ धायगुडे यांच्यासह हजारो लोकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन धनगर समाजाच्या मागे उभे राहून आपण उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत आरक्षणाबाबत कुठल्याही प्रकारची सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे दोघही आपल्या मागणीवर ठाम आहे. सरकारने दोन महिन्याचा कालावधी मगितल्यामुळे आपण चर्चेची दार खुली ठेऊ अशी मागणी धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. परंतु धनगर समाज आपल्या मागण्यावर ठाम आहे. धनगर आरक्षणा संदर्भात सरकार वेळकाढूपणा करत आहे.

आम्ही केवळ आमची अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असं बाळासाहेब तोडले यांनी स्पष्ट केल आहे.