थोरात साखर कारखाना उसाला २८३५ रुपये भाव देणार.

अहमदनगर जिल्ह्यात अग्रेसर ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कारखाना कार्यस्थळावर माजी आमदार बाळासाहेब थोरात (balasaheb thorat )यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की अहमदनगर जिल्ह्यात उसाची लागवड अधिक होणे गरजेचे आहे. एकरी उत्पन्न वाढल्यास उसाला जास्त भाव मिळेल यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने १० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. थोरात कारखान्याकडून (sugar factory sangamner)उसाला २८३५ रुपये बाजार भाव देणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले. ६ कोटी २२ लाख युनिट वीज अल्कोहोल अशा विविध खतांची निर्मिती केली आहे.

सीएनजी पेट्रोल पंप सुरू केला आता ग्रीन हायड्रोजन प्रकल्प येत आहे. यामधून जवळपास एक लाख आठ हजार कोटींचे चलन फिरणार आहे. पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पाण्यासाठी संघर्ष केला. त्यासाठी निळवंडे धरण पूर्णत्वास नेले कालव्यांचे रखडलेले काम अडीच वर्षात सरकारमध्ये मिळताच मार्गी लावले. उजव्या कालव्याचे काम आजही प्रगतीवर आहे.

डाव्या कालव्यातून दोनदा व तर उजव्या कालव्यातून एकदा पाणी देण्याची नियोजन होते. मात्र सरकार बदलल्यामुळे अनेक अडचणी आल्याचे आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.यावेळी नाशिक पदवीधर शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, सध्या लोकशाहीचा आवाज दाबला जात आहे. शेतकरी व सर्वसामान्यांना दूर फेकले जात आहे. (sudhir tambe)

देशातील मूठभर लोक श्रीमंत होत आहे. आदानींचे नाव कोणाला माहित नव्हते ते आता जगातील तीन नंबरचे श्रीमंत व्यक्ती आहे. थोरात कारखान्याच्या अनेक योजना आहेत राज्यात अग्रेसर असणारा हा कारखाना येथील नियोजन अन्य कुठे असेल असे वाटत नाही. याबाबतीत कौतुक केले पाहिजे. या सभेच नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांनी केले तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले.

२०१४ मध्ये समाईक कायदा लागू झाला. मात्र कायद्यातील त्रुटींबाबत सातत्याने आवाज उठवला या विरोधात अनेकदा तालुका बंद ठेवून आंदोलने केली मोर्चे काढले संघर्ष केला यासाठी न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू आहे. मात्र संघर्ष वेळी येथील पुढारी गप्प बसून होते अशी टीका यावेळी आमदार थोरात यांनी केली.