उपवासाची भगर खाणे भोवले! १०० हून अधिकांना झाली विषबाधा

नवरात्रोत्सवा निमित्त मोठ्याप्रमाणावर भाविक उपास पकडतात त्या उपवासाचे फराळ म्हणून खाल्लेल्या भागारीमुळे तब्बल १०० हून अधिक लोकांना विषबाधा झाली आहे. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील असून या घटनेने खळबळ उडाली आहे. अनेक जणांना मळमळ होणे, चक्क येणे, उलटी होणे असा त्रास सुरू असून यात विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या या नागरिकांवर बीड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


काय आहे प्रकरण?

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक जण उपवास करतात. बीड जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी अनेकांनी उपवास केला. या दिवशी फराळ म्हणून भगर खाल्ली. या भगरेतून ही विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. बहुतांश जणांना मळमळ होणे, चक्क येणे, उलटी होणे असा त्रास सुरू आहे. त्यामुळे विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढू शकते. मात्र, आतापर्यंत साऱ्यांची प्रकृती स्थिर आहे.


हे सर्व नागरिक नाळवंडी, जुजगव्हाण, पोळवाडी, पाली या गावातील ग्रामस्थ असून त्यांना भगरेतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर सध्या बीड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे यांनी एकदाच शंभरच्यावर रुग्ण आल्याने तात्काळ धाव घेत त्यांच्यावर उपचार सुरू केले.

उपवासाची भगर खाणे भोवले

या सर्वाना उपवासाची भगर खाणे चांगलेच भोवले असून खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून खाद्यपदार्थांमध्ये भेसळ झाल्याचे प्रमाण वाढत आहे. ठिकठिकाणी भेसळयुक्त शेकडो किलो पनीर, खवा अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जप्त करण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात ही कारवाई वाढते. मात्र, बीड जिल्ह्यातील अन्न, औषध प्रशासन नेमके करतेय काय, असा सवाल या निमित्ताने नागरिक विचारत आहेत.