राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी 28 डिसेंबरला होणार निवडणूक

नाशिक । प्रतिनिधी

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या संदर्भातील निर्णय गुरुवारी राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान याआधी काँग्रेसचे नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. मात्र प्रदेश काँग्रेस प्रमुखाच्या रुपात पदभार सांभाळण्याची जबाबदारी असल्याने त्यांनी हे पद सोडले होते. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सत्तारुढ युतीचा हिस्सा असलेल्या काँग्रेसकडून विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी एका खासदाराचे नाव दिले जाणार आहे. नवे विधानसभा अध्यक्ष हे प्रभावी रुपात बजेट सत्रापासून आपले कार्य सुरु करतील.

या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उर्जा मंत्री नितीन राऊत, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आहे. त्यापैकी थोपटे यांचे नाव अध्यक्ष पदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने होणार आहे. परंतु यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी आक्षेप घेतला. त्यांनी असे म्हटले की, महाविकास आघाडी सरकार हे सर्वाधिक असुरक्षित सरकार आहे. पुढे असे ही म्हटले की, तु्म्ही सांगता तुमच्याकडे पूर्णपणे बहुमत आहे. तर भीती कसली? अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी कोणतीही व्हिप नाही असे ही फडवणीस यांनी म्हटले.