नाशिकमध्ये नाताळची जय्यत तयारी, प्रार्थनास्थळे सजली

नाशिक । प्रतिनिधी

उद्यावर येऊन ठेपलेल्या ख्रिसमससाठी नाशिक सज्ज झाले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मात्र ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासन काय भूमिका घेते याकडे नाताळ प्रेमींचे लक्ष लागले आहे.

नाशिकसह जिल्ह्यात नाताळची जय्यत तयारी सुरु असून नाताळनिमित्त वेगवेगळ्या प्रार्थनास्थळांवर धार्मिक प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नाताळसाठी हे प्रार्थनास्थळे सजली असून आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. तसेच शहरातील ठिकठिकाणचे चर्च आकर्षक रोषणाई आणि येशू ख्रिस्त जन्माच्या आकसरहक देखाव्यांनी सजले आहेत. यानिमित्त बाजारपेठेत ख्रिसमस ट्री, आणि वेगवेगळ्या गिफ्टची रेलचेल झाली असून ग्राहकांच्या आकर्षणासाठी सांताक्लॉज सुद्धा तयार झाले आहेत.

दिवाळीनंतर वेध लागतात ते नाताळचे. उद्या नाताळ साजरा होणार असून यासाठी आज सायंकाळपासूनच ख्रिसमस एव्हीनीग साजरी करण्यात येणार आहे. नाशिकमधील अनेक बांधव हा मोठ्या उत्साहात साजरा करतात. नाशिकरोड आणि शरणपूररोड भागातील चर्च या ठिकाणी सुंदर देखावे साकारण्यात आले आहेत. तर जेलरोडवरील संत अँना, देवळाली कॅम्पस्थित सेंट पॅट्रिक चर्च आदी ठिकाणी उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान नाताळनिमित्त बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारची दुकाने सजली असून खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. याचबरोबर नाताळानंतर लागलीच थर्टी फस्ट हि येत असल्याने त्याचीही खरेदी करण्याकडे नागरीकांचा कल दिसून आला.