नाशिक :- नोव्हेंबर २०२३ मध्ये कार्यकाळ संपणाऱ्या तसेच रिक्त पदे असलेल्या ग्रामपंचायतींच्या(grampanchayat election) निवडणूकांचा नोव्हेंबर महिन्यात बिगुल वाजणार आहे. नाशिक जिल्ह्यातील (nashik district grampanchayat election) तब्बल 48 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर 49 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. पाच नोव्हेंबरला मतदान तर 7 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. आयोगाने जाहीर केले प्रमाणे ०६ ऑक्टोबर पासून ही प्रक्रिया सुरू होईल. तेव्हाच आचारसंहिता लागू होईल ९ नोव्हेंबरला निकालाची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत झाल्यानंतर ती पूर्ण होईल.
असा असेल ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम:-
६ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जाहीर केली जाईल ०६ ऑक्टोबर ते २० जानेवारी अर्ज भरणे २३ ऑक्टोबर अर्जाची छाननी करणे २५ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज माघारी घेणे 25 ऑक्टोबर चिन्ह वाटप करणे ०५ नोव्हेंबर मतदान ०७ नोव्हेंबर मतमोजणी आणि ०९ नोव्हेंबर निकालाची अधिसूचना.
राज्यातील २३५९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि रिक्त २९५० सदस्य पद व १३० सरपंच पदांसाठी पोटनिवडणूक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदन यांनी मंगळवारी ही घोषणा केली. संबंधित ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. गडचिरोली, गोंदियात ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता गावागावात राजकारण रंगणार आहे.
निवडणूक म्हंटल की एक राजकीय कलगीतुरा च रंगतो परंतु विधानसभा, विधानपरिषद यांच्या निवडणुकांपेक्षाही सर्वात चुरशीची लक्षणीय निवडणूक ठरते टी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल लागपर्यंत गावात केवळ निवडणुकीनचे वारे वाहत आसते त्यामुळे गावातील सामान्य माणसापासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरते.