जिल्ह्यात कांदा लिलाव पूर्ववत, कांद्याचे दर मात्र जैसे थेच..

नाशिक:- नाशिक जिल्ह्यात तब्बल १३ दिवस कांदा लिलाव बंद(Onion auction close) होते. त्यानंतर १७ कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवारी व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरू केले. लिलाव पूर्वीप्रमाणे सुरू झाले असले तरी कांद्याला योग्य भाव मिळलं ही शेतकऱ्यांची अपेक्षा मात्र फोल ठरली (However, the expectations of the farmers failed) आहे. बहुतांश ठिकाणी मागील १३ दिवसांपूर्वी जे भाव होते तेच भाव मिळाले तर काही ठिकाणी त्याही पेक्षा कमी मिळाले.

कांदा लिलाव सुरू झाल्यानंतर सरासरी दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळाले. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ समजली जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक २५४१ तर सरासरी २०५० रुपये भाव मिळाला कांदा लिलाव बंद पूर्वीही बाजारभावाची पातळी हीच होती. तब्बल १३ दिवसांनंतर सुरू झालेल्या कांदा लिलावाच्या पहिल्याच दिवशी लासलगाव बाजार समितीत ८०० हुन अधिक वाहनातून ११७३० क्विंटल कांद्याची आवक झाली(Onion intake)

१३ दिवस कांदा लिलाव बंद आसल्यामुळे कांद्याचे वजन घटले तर कांदे खराबही झाले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या विक्री होणारा उन्हाळ कांदा चाळीत साठवला असल्याने त्याचे आयुर्मान आणि वजन घटत असल्यामुळे कांदा खराब होण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

अत्यंत कमी असल्याने लाल कांदा येण्यासाठी नोव्हेंबर उजळण्याची शक्यता आहे. उन्हाळा कांदा संपुष्टात येत असताना लाल कांदा येण्यासाठी अजूनही उशीर होणार असल्याने उन्हाळ कांद्याच्या भावात आता तरी तेजी निर्माण होईल. या प्रतीक्षा शेतकरी आहे .त्यामुळे शिल्लक कांदा टप्प्याटप्प्याने बाजार समितीत विक्री आणण्यासाठी शेतकरी प्राधान्य देत आहे.