जिल्हाधिकाऱ्यांकडून गोदावरीसाठी महत्वाचे पाऊल.

नाशिक:- आगामी कुंभमेळा काळापर्यंत नद्या प्रदूषणमुक्ती साठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे “गोदा प्रदूषण” मुक्त संदर्भातील बैठकीत सांगितले. पर्यावरण तज्ज्ञांशी संवाद साधून आवश्यक उपाययोजना होत आहे. गोदावरी सह नाशिक जिल्ह्यातील वालदेवी, कपिला, नंदिनी, म्हाळुंगी व मोती या नद्यांसाठी सोलापूरच्या धर्तीवर टास्क फोर्स ची निर्मिती करावी. प्रत्येक नदीसाठी एक नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करून नदीसंबंधी चा अहवाल वेळोवेळी प्राप्त करून घेतला जाईल.

या महत्त्वाच्या बैठकीला मात्र पालिकेचे अधिकारी आणि प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीच दांडी मारल्याने उपस्थित संतप्त झाले होते. जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. यावेळी सत्संग फाउंडेशनचे आध्यात्मिक गुरु श्री. एम यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडलेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी गोदावरी सह जिल्ह्यातील नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहे.

नागरिकांनीही यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे उपवनसंरक्षक पंकज गर्ग जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, राज्यस्तरीय समितीचे अशासकीय सदस्य राजेश पंडित, नरेंद्र चुग, अभिनेते चिन्मय उदगीरकर, एम वसुकी, लक्ष्मण सावजी यांच्यासह जिल्ह्यातील नद्यांनी हाये नियुक्त समन्वयक अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यातील वनसृष्टी ही नद्यांची माता आहे.

या जंगलाचे संवर्धन करण्यासाठी प्रशासन स्तरावर जंगलाच्या सीमा निश्चित झाल्यापासून परिणामी अतिक्रमण व जंगलतोड थांबवण्यास मदत होणार आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर खूप कुंडे आहेत त्यांचे पुनर्जीवन केल्यास नद्यांची पातळी उगम स्थानापासून वाढवली जाईल. आगामी कुंभमेळा लक्षात घेता नदीत सोडले जाणारे सांडपाणी आतापासूनच आवश्यक उपाययोजनांची आणखी प्रशासनाकडून केली जावी अशी अपेक्षा जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.