‘रश्मी शुक्ला’ पोलिस महासंचालक बनण्याची शक्यता.

मुंबई :- राज्य पोलीस दलाचे महासंचालक रजनीश शेठ हे डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त होत आहे. त्यांची आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आणि राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती होणार याची उत्सुकता लागली आहे. आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पोलीस दलामध्ये बदल केले जात असल्याचे म्हंटले जात आहे.

रजनीश शेठ यांची बदली करण्यात आल्यामुळे त्यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याच बोलल जात आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निवड समितीने शिफारस केलेल्या तीन अधिकाऱ्यांना डावलून संजय पांडे यांच्याकडे प्रभारी म्हणून महासंचालक पदाचा कारभार दिल्याने. न्यायालयाने राज्य शासनावर कडक ताशेरे ओढले होते. फेब्रुवारी २०२२ लाचलुचपत मध्ये प्रतिबंधक विभागाचे महासंचालक असलेल्या रजनीश शेठ यांची राज्य पोलिस दलाच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती.

राज्याच्या पोलिस प्रमुखांची जबाबदारी स्वीकारली रजनीशेठ हे दोन महिन्यांनी म्हणजेच डिसेंबर 2023 मध्ये सेवन नृत्य होणार होते. मात्र त्या आधीच त्यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या वतीने पाठवण्यात आला. तेव्हा आता राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रश्मि शुक्ला यांची नियुक्ती होणार? की आणखी कोणाची नियुक्ती होणार याकडे संपूर्ण पोलिस विभागसह राज्याचे लक्ष लागले आहे. राज्य पोलिस महासंचालक पदी रश्मि शुक्ला यांची नियुक्ती झाल्यास त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक असतील.