महत्वाची बातमी:- महायुती सरकारमधील पालकमंत्री पदाचा तेढा अखेर सुटला.

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर झाली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाच म्हणजे पुण्याचे पालकमंत्री(Guardian Minister list ) पद अखेर अजित पवारांनी मिळाल आहे.मंगळवार पर्यंत चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते. त्यांच्याकडे आता अमरावती आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार आस बोललं जातं होत. आणि आज अखेर पालकमंत्री पदाचा तिढा सुटला आहे. त्यामुळे १४ महिन्यानंतर अजित पवार पुन्हा पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत.

१२ जिल्ह्यांचे नवे पालकमंत्री

१. अजित पवार – पुणे

२. राधाकृष्ण विखे पाटील – अकोला

३. चंद्रकांत पाटील – सोलापूर- अमरावती

४. विजयकुमार गावित- भंडारा

५. दिलीप वळसे पाटील – बुलढाणा

६. हसन मुश्रीफ – कोल्हापूर

७.धर्मरावबाबा आत्राम – गोंदिया

८.धनंजय मुंडे – बीड

९. संजय बनसोडे – परभण

१०. अनिल पाटील – नंदुरबार

११. सुधीर मुनगंटीवार -वर्धा

रायगड, सातारा सह इतर जिल्ह्यांचा पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.