‘त्या’ तरुणाचा मृत्यू संशयास्पद

नाशिक:- नाशिक शहरातील पंचवटी(nashikm panchvati) परिसरात राहणाऱ्या तरुणाचा सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे nandur shingote) येथील एका डब्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. गौरव नाईकवाडे असे मृत तरुणाचे नाव आहे . तोंडात कोंबलेला बोळा आणि पाठीमागे दोन्ही हात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला त्यामुळे हा खून आहे की घातपात या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

पुणे नाशिक महामार्गावरील नांदूर शिंगोटे बायपास(nandur shingote bypass) लगत असलेल्या एका डबक्यात सोमवारी रात्री उशिरा एम. एच. १५ एफ. एच.५४३७ क्रमांकाची मोपेड दुचाकी सकाळी परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आल्यावर तरुणाचा मृतदेह पाण्यात फुगून वर आल्याचे दिसले. वावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला त्यावेळी गाडीच्या क्रमांकावरून वावी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. तेव्हा शहरातील पंचवटी पोलीस ठाण्याच्या आधीतून रविवारी पासून एक जण बेपत्ता असल्याचे समजले त्या तरुणाच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर त्याच्या वर्णनानुसार मृतदेह गौरवचा असल्याचे स्पष्ट झाले.

वावी पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. रुग्णालयात गौरवच्या नातलगांना मृतदेहाची ओळख पटली. मंगळवारी सायंकाळी वावी पोलिसांत अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली. त्यानंतर उशिराने प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालानुसार वावी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. दरम्यान घडलेली घटना विचार घेतात त्याचा घातपात झाल्याचा पोलिसांना संशय आहे.