नाशकात अतिवृष्टीचा शेतकऱ्याला फटका; १२ हजार कोंबड्या पडल्या मृत्युमुखी

नाशिक: जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून यामुळे सिन्नर तालुक्यात एक शेतकऱ्याची मोठी हानी झाली आहे. सोमवारी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे पाझर तलाव फुटला आणि शेजारीच असलेल्या शेतकऱ्याच्या पोल्ट्री शेडमध्ये पाणी घुसले त्यामुळे पोल्ट्रीत असलेल्या १२००० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. यामुळे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.


घडलेली घटना विस्ताराने

सिन्नरच्या पुर्व भागातील मौजे उजणी व परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी ४ वा. दरम्यान ढगफुटी सद्रृश्य पावसाने हाहाकार झाला होता. उजणी परीसरातील गावा शेजारील पाझर तलाव हा एक महिण्यापुर्वीच तुडुंब भरून सांडवा निघालेला असताना सोमवारच्या झालेल्या अतिवृष्टी ने पाझर तलाव शेजारी असलेले शेतकरी मच्छिंद्र भिमाजी लोहार १२००० पक्षी असलेली कोंबड्याचे पोल्ट्री शेड मध्ये अचानक पाणी आले मुळे संपुर्ण १२००० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असून लाखोंचे नुकसान झाले आहे.

लाखोंचे झाले नुकसान

शेतकरी मच्छिंद्र भिमाजी लोहार यांनी ४५ दिवसांपूर्वीच लोहार यांनी १२००० पक्षी ४८ रू प्रती पक्षी प्रमाणे व खाद्य विकत घेऊन त्यांचे चांगले संगोपन केलेले होते. एक दोन दिवसात हे पक्षी विक्री होणार होते. तसे लोहार यांचे संबंधीत कंपनीबरोबर १२५ रू किलोचा दरही ठरलेला होता. परंतु अतिवृष्टीने लोहार यांचे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. यामुळे त्यांना मोठा फटका बसला असून त्यांचे आर्थिक व शारीरिक मेहनत पूर्ण व्यर्थ गेली आहे.

पावसाचा जोर काही सरेना

पावसाचा जोर कायम असून काल आणि आज पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून देखील विसर्ग बंद केला असून नदीची पातळी पुन्हा पूर्वपदावर आली आहे.