शनिवार, जून 3, 2023
घरताज्या बातम्याइगतपूरीतील विपश्यना केंद्रात आग

इगतपूरीतील विपश्यना केंद्रात आग

नाशिक । प्रतिनिधी

इगतपुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आंतरराष्ट्रीय विश्व विपश्यना विद्यापीठ केंद्रात आग अलगल्याची घटना घडली. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या हि घटना घडली.

इगतपुरीतील विपश्यना केंद्रात दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून मोठ्या प्रमाणात वणवा पसरला होता. हवेचा वेग जास्त असल्याने वणवा वेगाने घरांच्या दिशेने पसरत जात होता.

ह्या घटनेची माहिती मिळताच इगतपुरी अग्निशमन दलाच्या गाड्यांनी एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सदर घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र फळ झाडे व फुलझाडे जळून खाक झाली असल्याची माहिती विपश्यना केंद्र प्रमुखांनी दिली.

यावेळी अग्निशमन दलाचे रक्षक नागेश जाधव, कृष्णा गायकवाड, आरोग्य निरीक्षक यशवंत ताठे यांच्यासह पथकाने अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप