नाशिकरांची चिंता वाढवणारी बातमी! गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात शुक्रवारी विक्रमी करोना बाधितांची नोंद झाली आहे. चोवीस तासांत सुमारे १३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरात सर्वाधिक ८६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात कोरोना वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांत नाशिकसह जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. नाशिक प्रशासनाकडून कोरोनाचे निर्बंध लागू केले असतांना नवीन वर्षाच्या पहिल्याच नाशिककरांची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तब्ब्ल १३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महत्वाचे म्हणजे, नाशिक शहरात सर्वाधिक ८६ रुग्ण आढळून आले आहेत.

एकीकडे नवीन वर्षाचे स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र कोरोनाचा कहर वाढल्याने प्रशासनाला ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांतर पुन्हा रुग्णांचा आकडा १०० च्या वर गेल्याने चिंता वाढली असून आकडा असाच वाढत राहिला तर स्थानिक पातळीवरून देखील काही निर्बंध लागू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एकीकडे लग्न सोहळे, इतर समारंभांवर निर्बंध लागू केले असतांना अचानक रुग्ण संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून यामुळे सध्या लागू असलेल्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासन घेण्याची शक्यता आहे.