Home » खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार

खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार

by नाशिक तक
0 comment

नवी दिल्ली | प्रतिनिधी

एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराने खळबळ उडाली आहे.

मेरठमधील छिजारसी टोल प्लाझाजवळ ही घटना घडली. एवढेच नाही तर ओवेसी यांनीच ट्विट करून वाहनावर गोळीबार केल्याचा दावा केला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची उत्तर प्रदेश पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

ओवेसी हे मीरठमधील किथोर येथे एका निवडणुकीच्या कार्यक्रमानंतर दिल्लीला जात होतो. चिजारसी टोल प्लाझाजवळ काही लोकांनी गाडीवर गोळीबार केल्याची माहिती ओवीसी दिली आहे. त्यानंतर गोळीबार करणारे समाजकटकांनी शस्त्र तेथेच टाकून पळ काढला. सुदैवाने आम्ही सर्व सुरक्षित आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा एआयएमआयएम यूपीमध्ये भागीदारी परिवर्तन मोर्चासोबत एकत्र निवडणूक लढवत आहे. त्या पार्श्वभूमीवर ते उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचार करत आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!