एसएमबीटी कॉलेजच्या बसला ट्रकची धडक

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक औरंगाबाद महामार्गावर एसएमबीटी कॉलेजची बस आणि ट्रक मध्ये समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात १५ ते १७ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी हा अपघात झाला आहे. एसएमबीटी कॉलेजची बस विद्यार्थी घेऊन जात होती. यावेळी नाशिक औरंगाबाद महामार्गावरील मिरची हॉटेल जवळ बस आणि ट्रक यांच्यात समोरा समोर धडक झाली. अपघातानंतर बस उलटल्याने बसमधील काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे.

रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास मदत केली. जखमी विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून आडगाव पोलीस तपास करीत आहेत.