नगरसेवक राहुल दिवे यांचा ‘पुष्पा’ डान्स सोशल मीडियावर व्हायरल

नाशिक । प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-द राइज‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यातील गाण्यांनी अक्षरश धुमाकूळ घातला आहे. नाशिक मधील एका काँग्रेस नगरसेवकांने यातील एका गाण्यावर ठेका धरला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुष्पां चित्रपट सर्वांच्याच तोंडपाठ झाला असून यातील डायलॉग आणि गाणी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. पुष्पा चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ हे गाणे सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरले असून, सगळीकडे या गाण्याचीच धूम पाहायला मिळते आहेत. लहानापासून मोठ्यांपर्यत, क्रिकेटर्सपासून ते सेलिब्रिटीज पर्यंत हे गाणे ट्रेंडिंगवर आहे. आता राजकारणातही या गाण्याने वेड लावल्याचे दिसून येत आहे.

नाशिकमधील नगरसेवक राहुल दिवे यांनी श्रीवल्ली या गाण्यावर हुक स्टेप करून ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवे यांनी या गाण्यावर ठेका धरला असून तो प्रचंड आवडत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह नेते देखील पुष्पा गाण्यावर ठेका धरत असल्याने पुष्पाचा फिवर चांगलाच चढला असल्याचे पाहायला मिळते आहे.