जगात सर्वात आधी ‘या’ देशात होत नववर्षाचं स्वागत

नाशिक । प्रतिनिधी

जगभरात नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सा-या जगभरात जोरात सुरू असून नव्या वर्षांच्या जल्लोषाला भारतात रात्री १२ वाजतानंतर सुरूवात होणार असले तरी मात्र जगात असेही काही देश आहेत जिथे १२ च्या आतच नवीन वर्ष साजरे होते.

नववर्षाच्या सुरवातीला काही तासच शिल्लक असून सर्वजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर अनेकजण थर्टी फस्टच्या पार्टीचे नियोजन करण्यात व्यस्त आहेत. तर काहीजण नवीन वर्षाचे स्वागत कसे करायचे याचा प्लॅन करताना दिसत आहेत. काय नवीन प्लान करायचा, काय वेगळ करायच हा विचार अनेक जण करत असतील.

आपण अजून प्लॅनच करत आहोत मात्र जगातील काही देशांत नववर्ष लागले सुद्धा आहे. अनेक ठिकाणी जल्लोषात साजरे केले जात आहे. त्या देशाने नवीन वर्षात पदार्पण केले आहे. देशातील वेगवेगळ्या वेळेमुळे प्रत्येक देश वेगळ्या वेळेत नवीन वर्षात पदार्पण करणार आहे. तर मग जगात सर्वात आधी कोणता देश नवीन वर्षाचे स्वागत करेल हे पाहुयात…

३१ डिसेंबरच्या दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी ओशनियाच्या पूर्वेकडील बेटांवर नव्या वर्षाचे स्वागत होणार आहे. येथील टोंगा, सामोआ ही लहान पॅसिफिक बेट आणि किरिबाती हे नवीन वर्षाचे स्वागत करणारे पहिले देश आहेत. त्यानंतर नवीन वर्ष साजरे करण्यात न्यूझीलंड (दुपारी साडे चार वाजता), ऑस्ट्रेलिया (संध्याकाळी ६.३० वाजता), जपान (रात्री ८:३० वाजता), चीन (रात्री ९.३० वाजता), नेपाळचे काठमांडू (रात्री ११:४५ वाजता), भारत आणि श्रीलंका (१२:०० वाजता)