सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचे वर्चस्व, पहा विजयी उमेदवार यादी

नाशिक । प्रतिनिधी

मंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा शिवसेना (Shiv Sena) विरूद्ध नारायण राणे (Narayan Rane) ही खडाजंगी पाहायला मिळाली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg District Bank Election Result) निवडणूकीमध्ये नारायण राणे यांनी पुन्हा आपला गड राखण्यात विजय मिळवला आहे. भाजपच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने (Siddhivinayak Sahakar Panel) १९ पैकी ११ जागी विजय मिळवत आपलं वर्चस्व राखलं आहे. तर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi)सहकार समृद्धी पॅनेल ८ जागांवर विजयी झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक निकालामध्ये विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांचा पराभव झाला आहे. अध्यक्ष सतीश सावंत (Satish sawant) यांचा पराभव झाला आहे. निकालादरम्यान सतीश सावंत आणि त्यांचे विरोधक विठ्ठल देसाई यांना समान मते पडल्यानंतर चिठ्ठी टाकून निकाल लावण्यात आला. त्यामध्ये विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. सतीश सावंत यांच्या निकालाप्रमाणेच भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा (Rajan Teli) पराभव देखील धक्कादायक होता. महत्वाचे म्हणजे दोन वर्षांपूर्वी नारायण राणे आणि सतीश सावंत मित्र होते. मात्र सतीश सावंत पूर्वी नारायण राणेंचे सोबती होते. मात्र त्यांनी राणेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची गणितं बदलली होती.

भाजपाच्या विजयानंतर नितेश राणे (Nitesh Rane) आणि निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सोशल मीडीयातून आपल्या पहिल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. खासदार निलेश राणेंनी ‘ही सिंधुदुर्गाची माती आहे इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो.’ असं म्हटलं आहे तर नितेश राणेंनी ‘गाडलाच’ म्हणत एक पोस्ट केली आहे. दरम्यान जिल्हा बॅंकेची निवडणूक सिंधुदुर्गामध्ये चर्चेत होती.

विजयी उमेदवार यादी
सावंतवाडी- विद्याधर परब (शिवसेना), वैभववाडी -दिलीप रावराणे (भाजपा), मालवण- व्हिक्टर डांटस (एनसीपी), दोडामार्ग- गणपत देसाई (शिवसेना), कुडाळ- विद्याप्रसाद बांदेकर (काँग्रेस), कणकवली- विठ्ठल देसाई (भाजपा), अतुल काळसेकर (भाजपा), सुशांत नाईक (शिवसेना), गजानन गावडे (भाजपा), रविंद्र मडगावकर (भाजपा), मेघनाद धुरी, आत्माराम ओटणेकर, भाजप प्रणित उमेदवार गजानन गावडे, भाजप प्रणीत संदीप उर्फ बाबा परब, भाजप प्रणीत महेश सारंग, भाजपप्रणीत पॅनलचे मनीष दळवी, भाजप प्रणित प्रकाश बोडस.