नाशिककर सावधान ! दोन दिवसांत चार मुलींचे अपहरण

मुंबई । प्रतिनिधी

नाशिक शहरात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाणात वाढ झाली असून याप्रकरणी पालकांच्या तक्रारीन्वये अपहरणाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहे. यातून शहरामध्ये दोन दिवसांत चार बालिकांचे अपहरण झाले आहे. त्यामुळे बालिका, युवती बेपत्ता होण्याच्या तक्रारी सातत्याने वाढत असून आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यात नाशिक शहरात मुले मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी बरोबर अपहरणाच्या घटनांनी नाशिक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. आजच्या नाशिक पोलिसांच्या अहवालानुसार अंबड परिसरात राहणाऱ्या मुलीस घरातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अमिष दाखवुन पळवून नेल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या मुलीस घरातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अमिष दाखवुन पळवून नेल्याची माहिती म्हसरूळ पोलिसांना मिळाली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर तिसरी घटना सातपूर येथील असून या घटनेत मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार आहे. येथील शंभूशरण केदार शर्मा यांचा मुलगा निशांत (राजाबाबू) शंभूशरण शर्मा हा घरातून मी क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर जातो असे सांगून गेला व तो परत घरी न आल्याने कोणीतरी अज्ञात इसमाने त्यास फूस लावून पळवून नेल्याबाबतची तक्रार पालकांनी केली आहे. याबाबत सातपूर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

तर काल (दि.०८) रोजी देखील नाशिक शहरातून दोन मुलींचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे दोन दिवसांत चार मुलींचे अपहरण झाले आहे. एकीकडे मुलींच्या सुरक्षेसाठी निर्भया, डायल ११२ आदी सुविधा पोलिसांकडून असताना अशाप्रकारे अल्पवयीन मुलींचे अपहरण होत असल्याने पोलिसांसमोर आव्हान आहे.