नाशिकच्या तरुणाला ‘टॉयलेट स्किम’ पडली महागात!

नाशिक । प्रतिनिधी

राजस्थान सरकारच्या पर्यटन विभागाच्या ई टॉयलेट जाहिरातीच्या ई-टेंडरिंगचा कामात गुंतवणूक केल्यास कोट्यवधींचा नफा होऊ शकतो असे आमिष दाखवून नाशिकमधील युवकांसह व्यावसायिकांना तब्बल सहा कोटी ८० लाखांना गंडवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी गुजरात मधील १५ संशयितांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१८ ते २०२० या दरम्यान हि घटना घडली. सुशील भालचंद्र पाटील (वय 33, रा. ओंकार बंगला, गीतांजली को-ऑपरेटिव्ह सोसायटी, वाघ गुरुजी शाळेसमोर, पंपिंग स्टेशन गंगापूर रोड) यांना या प्रकरणात गंडवण्यात आले आहे.

सुशील पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयितांनी संगणमत करून विश्वास संपादन केला. राजस्थान सरकारच्या नावाने ही ई टॉयलेट पर्यटन विभागाच्या जाहिरातीसाठी केंद्राचे संपूर्ण राज्याचे कामकाज सामाविष्ट आहे. त्यात गुंतवणूक केल्यास कोट्यवधींचा नफा मिळू शकतो, असे खोटे आश्वासन देत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सुशील पाटील व संबंधित व्यावसायिकांकडून २०१८ ते २०२० दरम्यान ३ कोटी ९३ लाख ५४ हजार ७८८ रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच उर्वरित रोख रक्कम घेतली. असा एकूण सहा कोटी ८०लाखांचा अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक संजय भिसे करीत आहेत.