Video : म्हसरूळला रुग्णालयात घुसून डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण

नाशिक । प्रतिनिधी
म्हसरूळ परिसरातील लिलावती रुग्णालयात (Hospital) घुसून व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. घटनेनंतर मारहाण करणारा तरुण फरार झाला असून हि घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

दरम्यान म्हसरूळ परिसरात लिलावती रुग्णालयआहे. काल दुपारच्या सुमारास संशयिताने त्याच्या मित्राला रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. मात्र, उपचार करण्यास डॉक्टरांनी विलंब केल्याने तोडफोड आणि मारहाण केल्याची दृश्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. मारहाण झालेला डॉक्टर (Doctor) अरुण विभांडीक यांचा मुलगा आहे. मारहाण आणि तोडफोड केल्यानंतर मारहाण करणारा फरार झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर विभांडीक यांच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या प्रकरणी म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, म्हसरूळमधील डॉक्टरांच्या मुलाला झालेल्या मारहाणीचा प्रकार धक्कादायक आहे.

दरम्यान घटनेतील फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.तपासात पोलिसांना सीसीटीव्हीमधील फुटेजचीही मदत होते आहे. मात्र, नाशिकमधील रुग्णालयात घुसून तोडफोड केल्याच्या घटनेमुळे दहशतीच वातावरण निर्माण झालं असून आता यावर पोलीस काय भूमिका घेतात, येऊ पाहणे महत्वाचे ठरणार आहे.