संभाजी ब्रिगेडकडून शहीद दिनी शाहिरी अभिवादन

नाशिक । प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने (२३ मार्च) शहिद दिनी शहीदांना हुतात्मा स्मारक सीबीएस येथे क्रांतिगीत गाऊन अभिवादन करण्यात आले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे राष्ट्रप्रेम त्याचप्रमाणे त्यांची अफाट बुद्धिमत्ता वाचन, लिखाण, भगतसिंग यांनी लिहिलेले मी नास्तिक का आहे? या पुस्तकाविषयी संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख यांनी माहिती दिली. त्यानंतर संविधान गायकवाड यांनी क्रांतीगीत गाऊन शहीद भगत सिंग यांना अभिवादन केले.

शहिद दिनी प्रेरणा घेऊन संभाजी ब्रिगेडच्या कामगार आघाडीच्या नियुक्त्या यावेळी करण्यात आल्या. कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष पदी वैभव गायधनी यांची नियुक्ती नितीन रोठे पाटील यांनी केली तर कामगार आघाडी महानगर प्रमुख मंदार धिवरे यांची नियुक्ती बाळासाहेब खैरे यांच्या हस्ते करण्यात आली.

या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव नीतीन रोठे पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब खैरे हे उपस्थित होते. त्याच बरोबर महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, सरचिटणीस विक्रम गायधनी, संविधान गायकवाड, वैभव गायधनी, मंदार धिवरे, बापू मुरकुटे, निलेश गायकवाड, दीपक उजागरे, रोशन माने, चेतन सोनावणे, प्रथमेश पाटील, सचिन सतभाई, शंकर वाघमारे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.