रिकव्हरी एंजट ते वीस दुचाकी चोरटा गंगापूर पोलिसांच्या ताब्यात

नाशिक । प्रतिनिधी

शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरणारे हा सराईत गुन्हेगाराला गंगापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

राहुल मुसळे (वय ४४) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकाने आवाहन सोडताना पकडण्याचा सूचना करण्यात आले आहेत. यावेळी गंगापूर पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गस्त घालत होते.

यावेळी सिटी सेंटर मॉल परिसरात संशयित मुसळे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गंगापूर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्याकडे असेल मोटर सायकल देखील चोरीची असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता मूळ रीकवरी एजंटचे काम करत असलेला संशयित आरोपी राहुल मुसळे याला दुचाकी सोडण्याचा पुरेपूर ज्ञान असल्याने त्याचा फायदा घेत त्याने शहर परिसरातून २० हून अधिक दुचाकी चोरल्याची उघड झाला आहे. यामध्ये गंगापूर पोलीस स्टेशन कडील एक, सरकारवाडा, इंदिरानगर, अंबड, भद्रकाली, या पोलीस स्टेशन कडील गुन्हे उघडकीस आणले आहेत. दरम्यान या संस्थाकडून सहा लाख ६८ हजारांचा मुद्देमाल गंगापूर पोलिसांनी जप्त केला आहे.

हि कारवाई पोलीस आयुक्त दीपक पांडे, पोलीस उपयुक्त अमोल तांबे , सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगापूर पोलीस स्टेशन रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे.