मखमलाबादची रिद्धी शर्मा भारतात पोहचली, आज नाशकात येण्याची शक्यता

नाशिक । प्रतिनिधी

युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या नाशिक मधील विद्यार्थ्यांपैकी अनेक जण परतीच्या मार्गावर असल्याने पालकांना दिला दिलासा मिळाला आहे. मखमलाबाद येथील रिद्धी शर्मा ही विद्यार्थी युक्रेन मधून आलेल्या पहिल्या विमानाने भारतात पोहोचली असून आज ती नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान युक्रेनमध्ये नाशिकमधील अनेक विद्यार्थी अडकले असून त्यांना भारतात घेऊन येण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. सध्या काही विमाने भारतात येत असून यात अनेक विद्यार्थ्यांची नावे ही विमान प्रवासाच्या यादीत समाविष्ट आहेत. आज उद्या हे विमान युक्रेनमधून उड्डाण करण्याचा असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नाशिक मधील विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असून जिल्हा प्रशासन याबाबत शासनाची सातत्याने संपर्कात आहेत. यातील अनेक विद्यार्थ्यांच्या भारताच्या प्रवासाचा मार्ग सुकर झाला असल्याने येत्या दोन दिवसात ते मायदेशी परत येईल, अशी शक्यता प्रशासनाने वर्तवले आहे.

प्रशासनाने संबंधित पालकांशी संपर्क साधला असता बहुसंख्य पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांची संपर्क झाल्याचे सांगत तेथून निघाले असल्याचे सांगितले आहे. युद्ध परिस्थिती अधिक बिकट झाल्याने आपले पाल्य सुखरूप पोहचावे यासाठी पालकांचा धावा सुरू असून कुटुंबीय चिंता व्यक्त करू लागले आहेत. मात्र आपली मुले परतीला लागल्याचा दिलासा असला तरी जोपर्यंत मुले भारतात परतत नाहीत, तोपर्यंत पालकांच्या नजरा येणाऱ्या विमानाकडे लागल्या आहेत.