नाशिक | प्रतिनिधी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असली तरी काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांच्या चमूने म्हटले आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी लता दिदींवर मुंबई येथील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोना आणि त्यानंतर न्युमोनिया झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनतर आतापर्यत त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
लता दीदी या गेल्या आठवड्याभरापासून ब्रीचं कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल असून लतादिदींची काळजी घेण्याची गरज आहे. अजून स्थिर होण्यासाठी किती दिवस लागतील हे सांगता येणार नाही असे मत येथील डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, दिदींची तब्येत सध्या स्थिर आहे, मात्र डॉक्टरांच्या निगराणी खाली आणखी काही दिवस ठेवावे लागले, तसेच लता दिदींच्या प्रकृतीसंदर्भातील सर्व अपडेट माध्यमांना द्यावेत. तसेच मॅनेजमेंट आणि मंगेशकर परिवार एकत्रित चर्चा करून आरोग्य विषयक माहिती माध्यमांना देतील, असंही त्यांनी सांगितले.