Home » गॅस गिझरच्या गळतीने नाशिकमधील महिला वैमानिकाचा मृत्यू

गॅस गिझरच्या गळतीने नाशिकमधील महिला वैमानिकाचा मृत्यू

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

बाथरूमध्ये असलेल्या गॅस गिझरमध्ये गळती झाल्याने नाशिक मधील एका महिला वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रश्मी पराग गायधनी असे मृत महिला वैमानिकाचे नाव आहे. त्या मुंबईच्या रहिवाशी असून त्यांचे माहेर नाशिक असल्याने त्या इकडे आल्या होत्या. यावेळी रश्मी ह्या बाथरूममध्ये गेल्या असता गिझरच्या गॅसची गळती झाल्याने गॅस सर्वत्र पसरला. यामुळे रश्मी बाथरुमध्ये बेशद्ध पडल्या होत्या. बराच वेळ बाहेर आल्या नसल्याने घरच्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला.

तेव्हा रश्मी बाथरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गायधनी या मुंबईत वैमानिक म्हणून कार्यरत होत्या. जेष्ठ लेखिका सुमन मुठे, तर सेवानिवृत्त वनाधिकारी मारोती मुठे यांच्या कन्या होत. दरम्यान या घटनेने गायधनी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!