आदल्या रात्री केली घराची तोडफोड, दुसऱ्या दिवशी पोलिसांनी काढली धिंड

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये गुन्हेगारांवर वचक बसवणारे घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक रॉड भागातील चेहेडी पम्पिंग स्टेशन परिसरात तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची नाशिक पोलिसांनी धिंड काढली आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी नाशिकरॉड भागातील चेहेडी पम्पिंग भागात एका घरात रात्रीच्या सुमारास जाऊन, घरातल्या साहित्याची नासधूस करून, परीसरात शिवीगाळसह दहशत माजवली होती. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन दिवसांनी नाशिक पोलिसांनी या प्रकरणातील सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

नाशिक रोड परिसरात या सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली असून फटके देखील दिले आहेत. हे सर्व सराईत गुन्हेगार असून, त्याच्याकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने त्यास पोलिसी खाक्‍या दाखविण्यात आला.

गुन्हेगारांवर वचक बसावा आणि सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी, यासाठी पोलिसांनी पठाण व त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकून नाशिकरोड या परिसरामध्ये धिंड काढली.