खुशखबर; नाशिकारांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली..

by: ऋतिक गाणकवार

नाशिक : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाची मुसळधार सुरूच आहे.नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. अशातच एक आनंदाची बातमी समोर येते आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठा पातळी ७० टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे नाशिककारांची पाण्याची चिंता आता मिटली आहे.पुढे वर्षभराचा पाणी प्रश्न आता मिटला आहे. आणि पाऊस ज्याप्रकारे जिल्ह्यात सुरूच आहे, अशीच परिस्थिती पुढेही राहिल्यास हीच पाणी पातळी लवकरच शंभरीही गाठेल अशी शक्यता आहे.

यंदाचा उन्हाळा खूप भीषण होता. नाशिकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवले होते, पाणीसाठा फक्त तेवीस टक्केच शिल्लक राहिला होता. उन्हाच्या कडाक्याने काही ठिकाणी मागील काही वर्षांचे सर्वच रेकॉर्ड्स मोडले होते, पुढील वर्षीही उन्हाळ्याची स्थिती अशीच राहिल्यास पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल अशी परिस्थिती आहे.

आणि विशेष म्हणजे मागील वर्षी यावेळी फक्त २७ टक्केच पाण्याची पातळी गाठली होती. आणि यंदा हीच पाणीपातळी आता ७० टक्क्यांच्या आसपास गेली आहे. ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे.पाऊस काय थांबायचं नाव घेतच नाहीये अशीच परिस्थिती राहिल्यास यंदा लवकर जिल्ह्यातील पाणीसाठा १०० टक्क्यांची पाणी पातळी गाठेल अशी चिन्ह दिसत आहे. सलग ४ दिवस पावसाने हजेरी लावली होती, सोमवारी पावसाच प्रमाण थोडं कमी झाले असले तरी संततधार सुरूच होती. आणि आता मंगळवार पासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

सततच्या या पावसामुळे पुन्हा एकदा गंगापूर धरणातून मोठा विसर्ग करण्यात आला आहे नाशिकचा पूर मोजण्याचे पारंपरिक मापक दुतोंडया मारुतीच्या माने पर्यंत सध्या पाणी पोहोचले आहे.
अश्यातच मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे भरली गेली आहेत तर काही धरण ६० ते ६५ टक्के भरली गेली आहेत. नाशिकरांची तहान भागवणारे गंगापूर धरण देखील ६० टक्क्यांनी भरले गेले आहे.दारणा धरण ६० टक्क्यांच्या आसपास भरलेलं आहे, त्यामुळे आता नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे.

यंदा उन्हाळा सुरु व्हायच्या आधीच जिल्ह्यात पाण्याची टंचाई भासू लागली होती मागील वर्षी पावसाचे प्रमाणही थोडके होते. याच वेळी मागील वर्षी जिल्ह्यातील पाणी साठा हा फक्त सत्तावीस टक्क्यांचा आसपास होता पण यंदाची परिस्थिती ही चांगली आहे कारण जिल्ह्यातला पाणीसाठा हा ७० टक्क्यांचा वर गेला आहे. यंदा चांगला पाऊस पडेल असे हवामान विभागाकडूनही सांगण्यात आले होते. त्यामुळे कितीही कडक उन्हाळा असला तरी नाशिकरांची पाण्याची तहान भागणार आहे