शनिवार, जून 3, 2023
घरताज्या बातम्यागोदामाईला निरंतर वाहू द्या, तिला निवडणुकांचं प्रचारतंत्र बनवू नका…!

गोदामाईला निरंतर वाहू द्या, तिला निवडणुकांचं प्रचारतंत्र बनवू नका…!

नाशिक । प्रतिनिधी
नाशिककरांना ‘राजकीय गोदावरी’ नकोय, नदीला कॉस्मेटिक लूक नको, आम्हाला हवी स्वच्छ निर्मळ अविरतपणे वाहणारी गोदा माई हवी आहे, अशी आर्त भावना देवांग जानी यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकची गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे नाशिककर अनेकदा गोदावरीच्या समर्थनार्थ रस्त्यावरही उतरले आहेत. अलीकडे देवांग जानी यांच्या कुंडांना पुनर्वैभव देण्याच्या मागणीला देखील यश आल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक ठिकाणी गोदावरीच्या सिमेंट काँक्रेट ने बांधलेले घाट तोडण्यात येऊन गोदावरी मोकळी केली जात आहे.

एकीकडे असे असताना नाशिक महापालिकेची मुदत संपण्याच्या पूर्वसंध्येला महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यानी नमामि गोदेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकून घेतला. सध्या नाशिक महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली असली तरी काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकांसाठीचा हा मास्टर प्लॅन असल्याचे समजते. यावरूनच गोदाप्रेमी देवांग जानी गोदावरीला आपल्या फायद्याचे राजकारण करणाऱ्यांना फटकारले आहे.

गोदा प्रेमी देवांग जानी यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे नाशिककरांना देखील याबाबत जाब विचारला आहे. ते या पोस्टमध्ये म्हणतात कि, ‘आपल्याला “राजकीय गोदावरी” नकोय, नदीला कॉस्मेटिक लूक नको, आम्हाला हवी स्वच्छ निर्मळ अविरतपणे वाहणारी गोदा आई, ‘काय म्हणता नाशिककर, पटतं का? असा सवाल त्यांनी समस्त नाशिकरांना देखील केला आहे. त्याचबरोबर गोदावरीचे मूळ काम ना करता काठाची कामे करण्यावर भर दिला जात आहे. ज्या प्रकारे डॉक्टरच काम कंपाउंडर करतो, तशा पद्धतीने गोदावरीचे काम केले जात आहे.

देवांग जानी पुढे म्हणतात कि, गोदावरीला सर्जरीची गरज असून तेव्हा ती पुनप्रवाहीत होईल. त्यामुळे वर वर कॉस्मेटिक लूक देऊन काही होणार नाही, येऊ सगळे खायचे धंदे असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत फक्त नदीच्या सौंदर्यीकारणावर भर दिला जात आहे. त्यामुळे मूळ प्रश्नाला बगल देण्याचे काम केले जात आहे. म्हणजेच हि लोक नदीवर खर्च न करता नदीच्या काठावर खर्च करण्यात व्यस्त आहे, यास आमचा विरोध असल्याचे जानी सांगितले.

नाशिकमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘नमामि गोदा’चे भूमिपूजन काल घाईगडबडीत झाले. एकीकडे महापालिकेवर प्रशासक नेमला असताना आता राजकीय पुढार्यांनी आगामी निवडणुकांसोय केल्याचे या कार्यक्रमावरून दिसूल आले.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप