मोठी बातमी ! आरोग्य विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यानेच फोडला पेपर

नाशिक | प्रतिनिधी

आरोग्य भरतीच्या पेपर फुटी प्रकरणी मोठा मासा गळाला लागला असून मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यानेच पेपर फोडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुख्य प्रशासकिय अधिकारी प्रशांत बडगिरे यांना अटक केली आहे.

दोन महिन्यांपूर्वी आरोग्य भरतीचा पेपर झाला होता. यांनातर काही दिवसांत पपेपर फुटल्याचा बातम्या समोर आल्या. यानंतर पोलिसांनी चक्रे फिरवत अनेकांना अटक केली होती. आता लातूरमधून आरोग्य सेवा कार्यालयातील अधिकारी प्रशांत बडगिरे पेपर फोडल्याची पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याच विभागातील सहकाऱ्यांकडून पैसे घेत पेपर पुरवल्याचे तपासात उघड झाले आहे.

त्यामुळे आतापर्यंत पेपर फुटीच्या तपासाचे धागेदोरे मराठवाड्यापर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणी बीड, जालना, आंबेजोगाई येथील संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एक शिक्षक, आणि एका क्लार्कचा समावेश आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सायबर पोलिसच सहभागी असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर आतापर्यंत ११ जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान प्रशांत बडगिरे हे पेपर फूटीसाठी एका विद्यार्थ्यांकडूनपाच ते १० लाख रुपये घेतल्याचे तपासात उघड झाले.