Home » महाविकासआघाडीच्या पाठीमागे ईडीचा ससेमिरा सुरूच!

महाविकासआघाडीच्या पाठीमागे ईडीचा ससेमिरा सुरूच!

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

सरकार स्थापन झाल्यापासून महाविकासआघाडी सरकारला अनेक धक्के बसले आहेत. एकीकडे दिलल्लीत पक्षाची बैठक सुरु असतांना दुसरीकडे राज्यमंत्र्यावर ईडीची धाड पडली आहे.

महाविकासआघाडी सरकारमधील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीने सात तास चौकशी केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीच्या पाठीमागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळत आहे. आता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीने डोकेदुखी वाढवली आहे.

महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांची चौकशी करण्यात आली आहे. अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, अर्जुन खोतकर यांसारख्या अनेक मातब्बर नेत्यांची ईडीद्वारे चौकशी झाली आहे. ही त्यात आता तनपुरे यांची भर पडली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!