नाशिक जिल्ह्यांत ‘ही’ निडल फ्री लस दिली जाणार

नाशिक | प्रतिनिधी
ओमायक्रोन च्या पार्श्वभूमीवर प्रशासन तयारी करीत आहे. तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आता आरोग्य विभागाने नवा उपक्रम सुरू केला आहे.

दुसऱ्या लाटेनंतर देशभरात लसीकरणाला वेग आला. मात्र पहिला डोस अनेकांनी घेतल्यावर दुसऱ्या डोससाठी नागरिकांची उदासीनता दिसून आली.

दरम्यान नव्याने आलेल्या ओमायक्रोन च्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका, प्रशासन तयारी करत असतांना आता लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. यासाठी निडल फ्री लसीकरण होणार असून यामध्ये नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांची पायलट प्रोजेक्ट साठी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान ‘झायकोव -डी’ ही निडल फ्री लस दिली जाणार असून २८ दिवसाच्या अंतराने ०३ डोस दिले जाणार आहेत. यासाठी दोन्ही जिल्ह्यांमिळून ०८ लाख डोस मिळणार आहेत.