Home » नाशिकरोडला ‘पॅडमॅन’ स्टाईलने विवाह; नववधूचे सर्वत्र कौतुक

नाशिकरोडला ‘पॅडमॅन’ स्टाईलने विवाह; नववधूचे सर्वत्र कौतुक

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
लग्न समारंभात सर्व बडेजाव बाजूला ठेऊन लग्नाला आलेल्या सर्व महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाटण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. उद्योजक असणाऱ्या एका नववधूने आपल्या विवाह सोहळ्यामध्ये हा उपक्रम यशस्वी केला आहे. नाशिकरोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालयातील एका अनोख्या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महिलांच्या मासिक पाळी विषयी समाजात खुले पणाने चर्चा होत. मात्र स्वच्छतेचा महिलांमध्ये जागर व्हावा आणि आपल्या विवाहामध्ये शासनाच्या स्वच्छता कार्यक्रमाला हातभार लागावा या उद्देशाने जातेगाव येथील नववधू असणारी स्वाती दिघोळे हिने आपल्या विवाह समारंभात चक्क महिलांना भेटवस्तू म्हणून सॅनेटरी नॅपकिन वाटले आहे.

महिलांनी मासिक पाळी विषयी जनजागृती करावी आणि स्वच्छतेविषयी समाजात महिलांनी मोकळेपणाने संवाद साधावा हा या उपक्रमा मागचा हेतू असून तिला नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या पती अक्षय पानसरे यांनी मोलाची साथ दिली आहे. म्हणून या विवाहाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. लग्नाला उपस्थित असणाऱ्या वऱ्हाडी मंडळींसह पाहुणेमंडळी आप्तेष्ट व मित्रपरिवार यांनीही या अनोख्या भेटवस्तूचा सन्मानाने स्वीकार करत स्वाती दिघोळे हिचे कौतुक केले आहे.

लग्नात काहीतरी आगळेवेगळे करु अशी संकल्पना होती. माझा सॅनिटरी नॅपकिन निर्मितीचा व्यवसाय असून महिलांनी मोकळेपणाने समाजात मासिक पाळी विषयी जनजागृती करावी हा यामागचा उद्देश होता. मला माझे पती अक्षय पानसरे यांनी ही संकल्पना राबवण्यासाठी मोलाची साथ दिली. – स्वाती दिघोळे, नववधू

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!