अखेर ‘तो’ वटवृक्ष तोडण्यासंदर्भात मनपा आयुक्त म्हणाले..!

नाशिक । प्रतिनिधी

नाशिककरांचे झाडाविषयीचे प्रेम पाहून अभिमान वाटला, माझाही वृक्ष तोडीला विरोध आहे..त्यामुळे अडीचशे वर्षांचा तो वटवृक्ष तोडला जाणार नाही, असे आश्वासन मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिले.

गेल्या दोन तीन दिवसांपासून सिटी सेंटर मॉल जवळ असलेल्या महाकाय वटवृक्षाला वाचविण्यासाठी नाशिक एकवटले होते. त्यानुसार दोन हजाराहून अधिक हरकती देखील नोंदनविण्यात आल्या. या दरम्यान मनपा आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले कि, या प्रस्तावित उड्डाणपुलाचे पुनः एकदा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. हि समिती नव्याने आराखडा तयार करत असून यामध्ये झाडे तोडली जाणार नाही असा प्लॅन करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या प्लनमध्ये झाडाची छाटणी करणे, झाडाचे पुनर्रोपण करणे, झाडाचा विस्तार करणे या गोष्टीचा अवलंब करण्यात येईल. त्याचप्रामणे या मार्गाचे जिओ टॅगिंग केले जाणार असून त्यानंतर गुगल मॅप सुपरव्हिजन करून , मी स्वतः पाहणी केल्याशिवाय हे काम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर जुना महाकाय वटवृक्ष रस्त्याच्या बाजूला आहे, त्यामुळे पुलाचा पिलर रस्त्याच्या वर गेलं;यानंतर आवश्यक त्या ठिकाणी फांद्याच्या छाटणी केली जाईल, ज्या ठिकाणी छाटणी आवश्यक असेल त्या ठिकाणी छाटणी होईल , ज्या ठिकाणी झाड तोडायचे असेल त्या ठिकाणी त्याच प्रजातीच्या झाडाचे पुनर्रोपण होईल.. हे सर्व करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

नाशिक शहरातील नियोजित उड्डाणपुलासाठी ५८८ वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यावरून आता पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले असून सोमवारी अखेरच्या दिवशी तब्बल दोन हजाराहून अधिक हरकती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाशिककरांची एकजूट पाहून मनपा प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.