निफाड रस्त्यावर भरधाव कार थेट किराणा दुकानात घुसली!

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये एक भीषण अपघात (horrific accident in Nashik) झाला आहे. भरधाव कार थेट दुकाात शिरली (Speeding car enters into shop) शिरल्याची निफाड तालुक्यात घडली आहे. भरधाव कार थेट किराणा दुकानात घुसल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

https://www.youtube.com/watch?v=1y_RA9A2ZRQ

दरम्यान निफाडहून नाशिकला येत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला आहे. (दि.०१) रोजी सायंकाळी साधारणत: साडेपाच वाजण्याच्या हि घटना घडली. यावेळी या किराणा दुकानात एक ग्राहक सामान घेण्यासाठी आला होता आणि दुकानदार त्याला विक्री करत होता. त्याच दरम्यान भरधाव कार आली आणि थेट दुकानात शिरली.

प्राथमिक माहितीनुसार कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचा कारवरचा ताबा सुटून हा अपघात घडल्याचे समजते आहे. ही संपूर्ण घटना शेजारी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद (Accident caught in CCTV) झाली आहे.

सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र ही भरधाव कार थेट किराणा दुकानात घुसल्याने त्या दुकानाच मोठ नुकसान झाले. तर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.