शनिवार, जून 3, 2023
घरअपघाततपोवन कॉर्नरवर शिवशाही बस खांबावर आदळली; दुचाकीस्वाराचा मृत्यू

तपोवन कॉर्नरवर शिवशाही बस खांबावर आदळली; दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी

मुंबई आग्रा महामार्गावर प्रवास करणाऱ्या शिवशाही एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून ०६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई आग्रा महामार्गावर तपोवन कॉर्नर वर ही दुर्घटना घडली आहे. अधिक माहिती अशी कि, नाशिकहून औरंगाबादकडे शिवशाही बस निघाली होती. यावेळी मुंबई आग्रा महामार्गवरील तपोवन कॉर्नर आली असता उड्डाणपुलाखालील ४४ नंबरच्या खांबाला बस आदळली. यामुळे बसमधील प्रवाशी एकमेकांवर आदळले. यातच एका रस्त्यावरील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. जखमींना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अद्याप मयत झालेल्या दुचाकी स्वाराबाबत अधिक माहिती मिळून आली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप