शनिवार, जून 3, 2023
घरताज्या बातम्यायेत्या पंधरा वीस दिवसांत आरक्षणाचे चित्र स्पष्ट होईल

येत्या पंधरा वीस दिवसांत आरक्षणाचे चित्र स्पष्ट होईल

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महापालिकांचा बिगुल वाजला असून प्रभाग रचना जाहीर झाली आहे. त्यानंतर आता आरक्षणा बाबत देखील लवकर निर्णय होईल, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

पालकमंत्री भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की महापालिका निवडणुका जवळ येत आहेत. पुढील १५ ते २० दिवसात आरक्षण संदर्भात देखील चित्र स्पष्ट होणार असल्याने महापालिका निवडणुका आरक्षणाशिवाय पार पडणार नाही.

तसेच मागच्या निवडणुकीत आम्ही सगळे अडचणीत होतो, ताकतीने लढलो नाही. यंदाच्या निवडणुकीत मात्र सर्वजण जोमाने कामाला लागले आहेत. भाजपाची लाट देखील आता खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे यावेळी निवडणुका चांगल्याच होणार यात शंका नाही.

नाशिक महापालिका निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून झाल्या पाहिजे ही आमची भूमिका असून काँग्रेस ची एकला चलो ची भूमिका आहे तर तो त्यांचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप