Home » तरुणांनो! कठीण काळ आहे, बचत करायला शिका..! अशी करा बचत

तरुणांनो! कठीण काळ आहे, बचत करायला शिका..! अशी करा बचत

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

सध्याच्या परिस्थिती अतिशय बिकट होत चालली असून नोकऱ्या कमी बेरोजगार जास्त असे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे नोकरी लागल्यानंतर तुटपुंजा पगारावर काम करणे भाग असते. अशातच महागाई देखील प्रचंड वाढल्याने पगार आणि खर्च याचा मेल लागत नसल्याचे दिसून येते. यामुळे सध्या जे जो तरुणवर्ग नोकरीवर आहे यांनी बचत करणे महत्वाचे आहे.

प्रत्येक नोकरीला लागलेला माणूस आपल्या पगाराची वाट बघता असतो. कधी पगार पडल्याचा मेसेज येईल याचीच वाट बघतो. मग पगाराचा मेसेज आला कि माणसाचा आनंद गगनात मावेनासा होतो. मात्र अशावेळी महिन्याचा किराणा, देणे घेणे, बायकोचा खर्च इत्यादींमुळे अनेकदा पगार कधी संपून जातो कळत नाही. मात्र आता बचत करणे आवश्यक ठरणार आहे. येणाऱ्या काळात महागाई, पेट्रोल, खर्च वाढणार असल्याने बचत करणे अनिवार्य ठरणार आहे. यासाठी तरुणांनो हि बातमी नक्की वाचाच!

अशी करा बचत

मासिक वेतनाच्या कमीत कमी ३० टक्के रक्कम गुंतवणूक करा, काही लॉन्ग टर्म आणि काही शॉर्ट टर्म करावी.

गुंतवणूक -पीपीएफ, एफडी यात करावी.

पगार सुरु झाल्या झाल्या कर्जाच्या चक्रव्यूहात अडकू नका. घर, गाडी यांच्यासाठी डाऊन पेमेंट गुंतवणुकीतून करता येते.

गरज असल्यास क्रेडिट घ्यावे, अन्यथा विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

जास्तीत जास्त दोनच सेविंग अकाऊंट ठेवावे.

अनपेक्षित, आकस्मिक कारणांसाठी ०६ – ०८ महिन्यांचा पगार राखीव ठेवावा. हि रक्कम गुंतवणुकीव्यतिरिक्त असावी.

प्रत्येक खरेदी विचारपूर्वक करावी. किराणा यादी करूनच आणावा. सेल, ऑफर्सच्या आमिषाला बळी पडू नये.

शक्य असेल तर कामाच्या ठिकाणाच्या जवळ राहावे. भरपुर मानसिक त्रास कमी होईल आणि वेळ सुद्धा वाचेल. या वेळेचा उपयोग अतिरिक्त कौशल्य विकास साठी करता येऊ शकतो.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे, खर्चाचा हिशोब लिहून ठेवावा. आलेला पैसे जातो कुठे ते कळते आणि आपसूकच मग आर्थिक नियोजनाची सवय लागते.

अशा पद्धतीने जर बचत करण्यास सुरवात केली. तर निश्चित आपल्या बचतीत सुधार होण्यास मदत होईल.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!