Home » एस.टी आंदोलन तर भाजपच षडयंत्र – भुजबळ

एस.टी आंदोलन तर भाजपच षडयंत्र – भुजबळ

by नाशिक तक
0 comment

गेल्या काही दिवसांपासून एस.टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.मात्र आता या मुद्द्यावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.नाशिक ते बोलत होते. आपल्या विविध मागण्यांसाठी ऐन सणासुधीच्या काळात एस.टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारत आंदोलनाचा बडगा उचललेला आहे.त्यामुळे ST बंद असल्याने परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान होताना पाहायला मिळत आहे.तर या मुद्द्यावरून ” भाजप राजकारण करत असल्याचा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे”. ” हे आंदोलन भाजप मुळेच सुरु असल्याचे आरोप त्यांनी यावेळी केले,शासनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा विलगीकरण होऊ शकत नाही हे भाजप नेतेच आधी सांगत होतो आणि त्याचे क्लिप्स माझ्याकडे असल्याचा ” दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय .एस.टी कर्मचाऱ्यांच विलगीकरण होणार म्हणून भाजप नेते सांगत होते,तुमचे सरकार असताना तुम्ही स्पष्टपणे सांगितले मग आता आंदोलन का ?असा सवाल देखील मंत्री छगन भुजबळ यांनी भाजप समोर उपस्थित केला आहे.

त्यामुळे आता एस टी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानाला कुठेतरी वेगळेच राजकीय वळण लागतांना दिसून येत आहे. तर येत्या काळात एस टी कर्मचाऱ्यांच्या मुद्दावरून राजकरण जरी झाले ,तरी या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा मूळ मुद्दा हा भरकटायला नको.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!