पाच प्रांत अधिकाऱ्यांना नोटीस

नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे व आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे हाल होऊन मोठे नुकसान झाले आहे. तर या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी होत होती.असे असताना नाशिक जिल्ह्यात निफाड,मनमाड ,येवला,मालेगाव दिंडोरी, मालेगाव, दिंडोरी आणि कळवण या तालुक्यांतील प्रांताधिकाऱ्यांनी पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले होते मात्र यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यापुढे कामात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, अशी सक्त ताकिद देण्यात आली आहे.


यंदाचे अस्मानी संकटामुळे म्हणजेच यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली, त्यानंतर सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी, गुलाब चक्रीवादळ यांमुळे नाशिक जिल्ह्यातील सात तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.याबाबत शासन आदेशानुसार नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यंत्रणेला युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र,आदेश देऊन देखील दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी हे पंचनामे पूर्ण करण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे त्यांना हे पंचनामे पूर्ण करण्यासाठी मुदतवाढदेखील देण्यात आली. तरी देखील येवला, मालेगाव, दिंडोरी, निफाड व कळवण या तालुक्यांमध्ये पंचनामे वेळेत पूर्ण झाले नसून करण्यात आलेल्या हलगर्जीपणाचा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी गंभीर दखल घेतली आहे.वरील तालुक्यांच्या प्रातांधिकाऱ्यांना नोटीस बजावन्यात आली असून, स्पष्ट ताकीद देखील देण्यात आली आहे. तर पुढील काळात अशी चूक होणार नाही,यासाठी दक्षता घेतली जावी,असा इशाराच जिल्ह्याधिकारी यांनी दिला आहे.