एका सेकंदात भुजबळ यांच्या विरोधातील याचिका मागे घेईन-सुहास कांदे

आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.आज झालेल्या बैठकीत आमदार सुहास कांदे भुजबळ वादावर काही काळ पडदा पडण्याची चिन्ह आहे.


यावेळी सुहास कांदे यांनी डी.पी.डी.सी च्या निधी वाटपावरून बोलताना म्हंटले आहे की ,सध्या तरी माझं समाधान झाले आहे.गैरव्यवहारा बाबत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याचे आमदार सुहास कांदे यांच्याकडून सांगण्यात आलय.तसेच डीपीडिसीच्या निधी नियोजनासाठी 5 आमदारांची कमिटी तयार केली आहे,तर नांदगाव मतदार संघाला ७३ कोटी निधी देण्याचे आश्वासन देखील देण्यात आले असून मात्र हे आश्वासन प्रत्येक्षात उतरले नाही तर, पुन्हा आंदोलन करू असा इशारा देखील आमदार सुहास कांदे यांनी दिला आहे.

दरम्यान मागच्या काही दिवसानापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये विविध मुद्द्द्यांवरून वाद सुरु आहे,यासंदर्भांत कांदे यांना विचारले असता माझा मुद्दा हा विकासाच्या मुद्द्यावर आहे,तसेच मी यासंदर्भांत मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर देखील हा विषय टाकला आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा जरा मला sms आला तर मी भुजबळांविरोधात केलेली याचीका तात्काळ मागे घेईल असे देखील सांगायला कांदे विसरले नाहीत.
सकाळी ही नियोजन समितीची बैठक सुरु झाली तेव्हा आमदार कांदे समर्थांची जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी पाहायला मिळाली होती,मात्र पोलिसांनी ही बाब लक्षात घेत कांदे समर्थकांना बाहेर काढल्याचे देखील पाहायला मिळाले होते.