Home » बाबासाहेबांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन..!

बाबासाहेबांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन..!

by नाशिक तक
0 comment

भूषण, पदमविभूषण,पुण्यभूषण, शिवशाहीर,इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या १००व्या वर्षी दुःखद निधन झाले,आज त्यांच्या अस्थींचे नाशिकच्या रामकुंडात विसर्जन करण्यात आलं.


नागपूरचे बाबासाहेब पुरंदरे यांचे स्नेही आणि साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठानचे विश्वस्त मकरंद कुलकर्णी यांच्या हस्ते नाशिकच्या रामकुंड परिसरात विधिवत पूजा करून बाबासाहेबांच्या अस्थींचे विसर्जन करत त्यांना अभिवादन केलं गेलं.अस्थी विसर्जन करताना मकरंद कुलकर्णी यांना अश्रू अनावर झाले होते.अस्थी विसर्जन करताना अमर रहे,अमर रहे,बाबासाहेब अमर रहे,परत या,परत या,बाबासाहेब परत या घोषणांनी रामकुंड परिसर हा दणाणला होता.बाबासाहेबांचे सर्वच स्नेही देखील यावेळी भावुक झाले होते.


ज्यावेळी ते शिवाजी महाराज यांच्या बद्दलची व्याख्यान देयचे त्यावेळी साक्षात डोळ्यासमोर छत्रपति शिवाजी महाराजच जणू उभे आहे कि काय..? असं वाटायचे,तर आज छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण जे ओळखतो आहे ते घरोघरी पोहोचवण्याचे काम हे बाबासाहेबांनी केलं असल्याचे सांगत, यावेळी मकरंद कुलकर्णी यांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!