ध्वनी प्रदूषणात नाशिक राज्यात टॉप 10 मध्ये,धोका वाढला

राज्य नियंत्रण महामंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत नाशिक हे राज्यातील टॉप 10 ध्वनिप्रदूषणाने वेढलेल्या शहरांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.
निसर्गाचे वरदान असलेल्या आणि धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकला आता ध्वनी प्रदूषणाने वेढले आहे.राज्यात नाशिक हे ध्वनी प्रदूषण जास्त असेलल्या टॉप 10 शहरात समाविष्ठ झाले आहे.आता ध्वनी प्रदूषणात नाशिक राज्यात टॉप 10 मध्ये आल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.
राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून ही यादी जाहीर करण्यात आलीये .नाशिक मध्ये दिवसा 75.2 डेसीबल तर रात्री 68.2 डेसीबल पर्यंत ध्वनी प्रदूषण होत असल्याची नोंद करण्यात आली आहे.


ध्वनी प्रदूषण हे सुरक्षा मानक मर्यादेच्या पातळी पलीकडे जात असल्याने आता जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ याची दखल घेण्याची गरज आहे,अन्यथा हे प्रमाण अधिक वाढले तर संपूर्ण नाशिक वासियांसाठी हा एक मोठा धोका निर्माण होऊ शकतोय.त्यामुळे नाशिककरांनो आपण देखील नाशिक हे ध्वनी प्रदूषण मुक्त व्हावे आणि नाशिककरांच्या आरोग्यावर या ध्वनीप्रदूषणाचा परिणाम होऊन मोठा धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे,जेणेकरून निसर्गाचे वरदान असलेल्या या नाशिक नगरीची ओळख ही प्रदूषणाने वेढलेले शहर अशी होयला नको.