..अण बाजार भरला चर्चमध्ये !

चक्क चर्च मध्ये बाजार…! यावर आपला विश्वास बसणार नाही ,हो पण हे खर आहे. मनमाडच्या संत बार्णबा चर्च मध्ये वर्षाचे पहिले पीक देवाला अर्पण करण्यासाठी नाताळ सण साजरा करण्या अगोदर नोव्हेबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बाजार भरवत ख्रिश्चन बांधवांकडून “हंगाम सण” साजरा करण्यात आला.दर वर्षी हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो यंदा देखील मोठ्या आनंदात आणि उत्साहात हा “हंगाम सण” मनमाड येथील संत बार्नबा चर्चमध्ये साजरा करण्यात आला.

हा बाजार नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील “संत बार्नबा” या चर्च मध्ये भरला आहे.दरवर्षी प्रमाणे यंदा देखील नोव्हेंबर महिन्यात हा “हंगाम सण” साजरा होत असतो.असा हा वार्षिक बाजार, मनमाडच्या संत बार्णबा चर्च मध्ये भरतो.वर्षाचे पहिले पीक देवाला अर्पण करण्यासाठी नाताळ सण साजरा करण्या अगोदर नोव्हेबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा बाजार भरवून ख्रिश्चन बांधव ” हंगाम सण ” साजरा करतात. या सणाची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे.

चर्चच्या आवारात भरविण्यात आलेल्या या बाजारात कोंबडी पासून बोकड पर्यंत,भाजीपाला,धान्य,खाद्यपदार्थ यासह मोठ्या प्रमाणात सर्वच प्रकारची दुकान लावण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हा बाजार भरला नव्हता.आज बाजार भरल्यानंतर वस्तू खरेदीसाठी ख्रिश्चन बांधवांची झुंबड उडाली होती. विशेष म्हणजे या बाजारात वस्तूंची विक्री केली जात नाही ,तर त्यांचा लिलाव केला जातो.लिलावातून मिळणारी रक्कम समाजातील गोरगरिबांसाठी वापरले जाते.त्यामुळे या बाजारात समाज बांधव जास्तीत जास्त बोली लावून वस्तू खरेदी करत असतात.