विश्वहिंदू परिषद करणार राज्यपालांकडे तक्रार

नाशिक : प्रतिनिधी

मागच्या आठवड्यात अमरावती आणि राज्याच्या इतर भागात ज्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या त्या विरोधात आता विश्वहिंदू परिषद आक्रमक झाली आहे. या घटनांची दखल घेत या संदर्भांत थेट राज्यपालांना भेटून तक्रार करणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद चे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांड यांनी नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सोबतच त्यांनी आरोप केला आहे की रजा अकॅडमी आणि इतर ६ संघटनांनी मुस्लिमाना त्रिपुराच्या कथित घटने विरोधात एकत्रित येण्याच आवाहन केलं, आणि त्या नंतर षडयंत्र रचत हिंसाचार घडविला त्यावेळी पोलीस आणि प्रशासनाने कुठलंही पाऊल उचलले नाही,मात्र हिंदूंनी उत्तर देण्याचा प्रयत्न करताच त्यांच्यावर लाठीचार्ज आणि अश्रूधुर सोडण्यात आला. ही कृती योग्य नसून महाराष्ट्रात ही कृती करणाऱ्या रजा अकॅडमी आणि इतर संघटनांवर कठोर कारवाई करत त्यावर बंदी आणावी अशी मागणी देखील विश्वहिंदू परिषद ने केली आहे.


मागच्या आठवड्यात त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचे पडसाद मालेगाव,अमरावती, या जिल्ह्यांसह राज्यातील इतर काही भागात जाळपोळ,दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या या घटनेनेनंतर पोलिसांनी कडक भूमिका घेत लाठीचार्ज करत संचारबंदी देखील लावली होती.याच घटनांसंदर्भात आत विश्वहिंदू परिषदेने आक्रम भूमिका घेत याबाबत राज्यपालांकडे तक्रार करणार आहे. यासर्व घटनांकडे राज्यपाल कसे पाहतात हे बघणं देखील महत्वाचे ठरणार आहे.