विरोधकांनी 5 वर्ष दिवस मोजण्याचं काम करावं-शरद पवार

इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेंव्हा त्यांच्या विरोधातही नेतृत्व नव्हतं मात्र सगळ्या शक्ती मोरारजी देसाई मागे उभ्या राहिल्या, त्यामुळे विरोधी पक्षाकडे चेहरा नाही असं म्हणता येणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.तर त्रिपुराच्या घटनेचे पडसाद हे महाराष्ट्रात देखील उमटल्याचे दिसून आले.यावर बोलताना शरद पवार यांनी विरोधकांना देखील टोला लगावला आहे.

ते म्हणाले कि,त्रिपुरात घडलं म्हणून महाराष्ट्रात अस घडण योग्य नाही, महाराष्ट्रात काही संघटना अशा घटना करतात हे योग्य नाही,तर महाराष्ट्रातील काही मोजक्या भागात या घटना घडल्याय ,त्यामुळे या प्रवृत्तींना किती महत्व द्यायचं हे लोकांनी ठरवावं.तर राज्य सरकार चांगलं काम करत असतांना बंदचा निर्णय नैराश्यातून सार्वजनिक शांततेला धक्का बसेल अस काम काही राजकीय पक्षांचे घटक करताहेत हे दुर्दैव असल्याचे देखील पवार यांनी म्हंटले आहे.तीन चार राज्याच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून हे जाणीवपूर्वक केलं असून याचा फटका सामान्यानांच बसतोय असे देखील मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे.याविषयावर बोलताना, “आम्ही जर ठरवून घेतलं आहे की जुळवून घ्यायच..! त्या मुळे हे सरकार सुरू आहे” ,आणि ” आज सरकार जाईल उद्या जाईल असं म्हणणाऱ्या विरोधी पक्षाने दिवस मोजायच काम करावं असा खोचक टोला पवार यांनी लगावला” .महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल,असा विश्वास शरद पवार यांनी यांनी व्यक्त केलाय”.

तसेच एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपावर बोलतांना पवारांनी स्पष्ठ केलेय कि,एस.टी. कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण शक्य नाही,असं प्राथमिक दृष्ट्या तरी दिसतंय तुम्ही जिथे आहात तिथे प्रश्न सोडवले पाहिजे, दुसरीकडे वर्ग करून प्रश्न सोडवा अस म्हणणे अयोग्य असून न्यायालयाने देखील या बाबत स्पष्ट भूमिका दिलेली आहे.तर कामगार संघटना आणि राज्यसरकारने एकत्र बसून यावर तोडगा काढावा असे देखील शरद पवार यांनी म्हंटले आहे.
याचबरोबर आस्थेला देखील धक्का बसविण्याचे काम यामुळे होत असून, एकादशीला असंख्य लोक वारीला जातात त्यांचे देखील या संपामुळे हाल होत असल्याची खंत शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.