बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाहीत ही अस्वस्थ करणारी घटना

इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांचे १०० व्या वर्षी दुःखद निधन झालेय यामुळे शिवछत्रपतींचा इतिहास जपणार एक मोठं व्यक्ती महत्व आज आपल्यात नाही.यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे.


महाराष्ट्राच्या नव्या पिढीला इतिहास समजावा या साठी ज्यांनी काळजी घेतली असे योगदान देणारे पुरंदरे आपल्यात नाही अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.,वयाचे १०० वर्ष आयुष्य त्यांनी यशस्वी पणे पार केले.विशेष म्हणजे जनसंपर्क ठेऊन त्यांनी हा टप्पा पार केलंय ,ते आज आपल्यात नाहीत हि अनेकांना अस्वस्थ करणारी घटना असल्याचं देखील राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले आहे. त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास ठेवला तो वादग्रस्त देखील ठरला ,मात्र त्यावर बोलण्या इतका मी इतिहास अभ्यासक नसून ,संपूर्ण आयुष्य ज्यांनी या कामात घातलं त्यांच्या बद्दल अशा बदनाम्या कदाचीत पसरवले असाव्यात अस देखील पवार म्हणाले.. नाशिक मध्ये शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली.