Loksabha Election: 2024 मध्ये देशातील या पाच राज्यांमध्ये सरकार बदलणार, संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये सरकार बदलणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज अहमदनगरमध्ये एका मुलाखतीत केला आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पाच राज्ये देशातील सत्ता परिवर्तनाचे कारण बनतील. ही राज्ये महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि बिहार असतील. जनता शांत दिसत आहे पण त्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे.

ही नाराजी देशातील सत्ता परिवर्तनाच्या रूपाने व्यक्त होणार आहे. असा दावा उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळेच या राज्यांमध्ये दंगली भडकवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे राऊत म्हणाले. एका खास मुलाखतीत त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला.

संजय राऊत आज (शुक्रवार, 7 एप्रिल) अहमदनगर दौऱ्यावर आहेत. इथेच त्यांनी आपल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानला आव्हान देण्यासाठी निर्माण झालेल्या वातावरणाचा त्यांनी वारंवार समाचार घेतला. राऊत म्हणाले की, पाकिस्तान हा छोटा देश आहे. पाकिस्तानने नव्हे तर चीनने भारतात प्रवेश केला आहे. लडाख आणि अरुणाचलमध्ये गेलात तर कळेल की चीन किती आत घुसला आहे.